Ladki Bahin Yojana eKYC Online Process @ ladki bahin.maharashtra.gov.in

Advertisement

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 ची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते.

ही मदत पुढेही मिळत राहण्यासाठी e-KYC करणे खूप महत्त्वाचे आहे. e-KYC म्हणजे तुमचा आधार आणि बँक खाते तपासून सरकार तुमची ओळख खात्री करते.

या लेखात आपण बघू — Ladki Bahin Yojana e-KYC ऑनलाइन कशी करायची, प्रक्रिया करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

eKYC Last Date
31 डिसेंबर 2025

लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करावी?

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी अधिकृत ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc वेबपेज वर जा.
  • त्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक आणि कॅप्टचा दर्ज करा शेवटी आधार प्रमाणीकरणासाठी संमती साठी मी सहमत आहे याला टिक मार्क करून ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करा.
  • आधार शी लिंक असलेल्या मोबाइल वर OTP प्राप्त होईल तो दर्ज करून सबमिट करा.

  • त्यानंतर वडिलांचा/पतीचा आधार क्रमांक आणि कॅप्टचा दर्ज करा शेवटी आधार प्रमाणीकरणासाठी संमती साठी मी सहमत आहे याला टिक मार्क करून ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करा.
  • आधार शी लिंक असलेल्या मोबाइल वर OTP प्राप्त होईल तो दर्ज करून सबमिट करा.

  • आता जात प्रवर्ग निवडा त्यानंतर उपरोक्त अ.क्रं. १ आणि निट वाचून त्यात योग्य तो पर्याय निवडा. शेवटी टिक मार्क करून सबमिट करा.

  • शेवटी तुमच्या स्क्रीनवर eKYC पूर्ण झाली अशी सूचना येईल.

लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप उपयोगी योजना आहे. या योजनेमुळे पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 ची मदत मिळते.

पण ही रक्कम पुढेही मिळत राहण्यासाठी e-KYC करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि तुम्ही ती ऑनलाइन घरबसल्या करू शकता.

फक्त तुमचा आधार नंबर, मोबाइल नंबर आणि थोडी माहिती लागते. म्हणून वेळ न घालवता आजच तुमची e-KYC पूर्ण करा, जेणेकरून तुमचा हक्काचा पैसा वेळेवर मिळेल.

Advertisement

Leave a Comment